रेडक्रास सोसायटी येथे नागरीकासाठी दोन दिवसीय मोफत पुष्प प्रदर्शनी
अकोला / प्रमोद मोहरील
पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गाचे संवर्धन ही केवळ मानवी नव्हे तर समस्त सृष्टीसाठी अत्यावश्यक बाब आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण ही आज काळाची गरज आहे हे निर्विवाद सत्य ! परंतु या प्रक्रियेत माणूस निसर्गापासून दूर होत आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करून निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न म्हणुन गत वर्षाप्रमाणेच यावर्षी ही दोन दिवसीय मोफत पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती रेडक्रास येथे गुरुवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी रेडक्रासचे प्रभजितसिह बछेर,अँड सुभाषसिह ठाकुर, सिए मनोज चांडक ,प्रदर्शनीच्या संयोजिका शारदा डोंगरे आदी उपस्थित होते.रेडक्रॉस येथे दि 27 व 28 जानेवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत दोन दिवसीय गुलाब पुष्प व इतर वृक्षवल्लीचे प्रदर्शन होत आहे. शारदा डोंगरे या वृक्षवेडया भगिनीचे अथक परिश्रम आणि रेड क्रॉस सोसायटीच्या समन्वयातून संपन्न होणाऱ्या या निःशुल्क पुष्प प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.