महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न

युवतीने मिरची पूड आणि मूव्ह स्प्रे वापरून केली स्वतःची सुटका
गोवा / नवप्रहार मीडिया नेटवर्क
म्हापासतील खोर्ली येथे महाविद्यालयीन तरुणीला शेजारी राहणाऱ्या अल्पसंख्यांक युवका कडून पळवून नेण्याचा प्रयन्त करण्यात आला आहे. तरुणीने मिरची पूड फेकून आणि त्याच्या तोंडावर मूव्ह स्प्रे मारून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली आहे.या नंतर देखील युवक पळून जाण्यात यशस्वी ठरला होता .पण पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटेश्वर नगर, खोर्ली येथे एका कॉलेजच्या युवतीला कॉलेज परिसरातून पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज दुपारी घडला. याबाबतची तक्रार आज युवतीने दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीला बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आल्याने तीने संशयित आरोपीपासून स्वतःचा बचाव केला. संशयित पळून जात असताना युवतीने त्याचा पाय पकडला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यावर स्थानिक जमा झाले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस येण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.युसूफ शेख रा. बार्देश असे संशयिताचे नाव असून तो फरार होता. मात्र संशयिताला अटक करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी हा युवतीला वारंवार फोन करून मेसेज पाठवत असे. आज दुपारी 1.30 च्या सुमारास संशयिताने पीडित मुलीचा पाठलाग केला. संशयित कारमधून बाहेर येताच युवतीने संशयिताच्या चेहऱ्यावर मिरची पावडर आणि मूव्ह स्प्रेची फवारणी केली.
संशयित आरोपी आणि पीडित मुलगी शेजारी आहेत. दुचाकीचे सुटे भाग देण्याच्या बहाण्याने तो तरुणीला फिरायला घेऊन गेला होता. संशयित आरोपी पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना ओळखत असल्याने तिने त्याच्यासोबत कारमधून प्रवास करण्याचे मान्य केले होते. दरम्यान, कारमध्ये त्याने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर विनयभंग आणि बलात्कार केला.