सामाजिक

यशवंत फॉउंडेशन राबविणार जल जागृती अभियान:-पवन थोटे

Spread the love

 

यवतमाळ / प्रतिनिधी

1 मे महाराष्ट्र दिनापासून ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती ( 31 मे ) पर्यंत यशवंत फॉउंडेशन तर्फे जल जागृती अभियान राबविले जाणार असल्याची माहिती यशवंत फॉउंडेशनचे अध्यक्ष पवन थोटे यांनी दिली.
यशवंत फॉउंडेशन ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या भागाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला जल है तो कल है हा संदेश देणे आता आवश्यक ठरू पाहत आहे दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी कमी होत असतांना येणाऱ्या काळात पाणीटंचाई ही संपूर्ण जगाची समस्या ठरणार आहेत,त्यासाठी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे,पाण्याची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घेण्याचे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे याची जनजागृती म्हणून यशवंत फॉउंडेशन तर्फे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात जल है तो कल है हे अभियान राबविण्यात येणार आहे, जिल्ह्यात दुष्काळ असलेल्या भागाचा दौरा करून त्या भागात पाण्याची व्यवस्था कश्या प्रकारे करता येईल त्यांना पाणी पुरविण्यासाठी कश्याप्रकारे मदत करता येईल याची माहिती घेणार असल्याचे यशवंत फॉउंडेशनच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष पवन थोटे, सुरेशराव भावेकर,राजेश मदने, निलेश चामाटे,नितीन गोरले, निखिल गोफने,विजय धानोरकर, मनमोहन कापडे,विलास अवघड, दिनेश टेकाडे,मंगेश गाडगे,प्रशांत चिव्हाणे,नितीन कोरडे,प्रमोद मेटांगे,रामदास महात्मे,राजू बाहेकर,गजानन शेळके,विकास निळं,राजेंद्र होटे,बंडू महानर, विलास महानर,श्याम उघडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close