शाशकीय

मोहाडी तालुक्यात रोजगार हमी योजनेत भ्रस्टचाराचा बोलबाला.

Spread the love

A.C.B. धाडेने केले सिद्ध.

आणखी मोठे मासे बाहेर.

मोहाडी. / प्रतिनिधी
मोहाडी तालुक्यातील पंचायत समिती मधील रोजगार हमी योजना विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला असून नुकत्याच पडलेल्या A.C.B. धाडेने सिद्ध केले असून पैसे घेणारे मोठे व लहान मासे बाहेर आहेत.
मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी योजना विभागात १० ते १२ वर्षा पासून येथील अभियंते ऑपरेटर एकाच पंचायत समिती मध्ये शासनाच्या आशीर्वादाने ठिय्या मांडून बसले असून अभियंतेच मुरूम रोड.सिमेंट काँक्रिट रस्ते नाल्या बांधकामाचे ठेकेदार आहेत.कामाचे मोजमाप हेच करतात.ठेकेदार हेच मग काम कसे असेल?
मोहाडी तालुक्यात अनेक गावात J.C.B. व्दारे M.R.E.G.S. चे काम करून मजुरांना घर बसल्या अल्पसी मजुरी मिळते.
पांधन रस्त्यावर मुरूम टाकने पाणी मारून रोलर मारून त्या मुर्माची जाडी (थिटनेस) ६ इंच राहणे गरजेचे आहे पण त्या पांधन रस्त्यावर दोन इंच मुरूम पडत नाही.
त्यागावातील शेतकरी जागृत लोक तक्रार करतात जिल्हाधिकारी ती तक्रार तक्रार निवारण अधिकारी यांच्या कडे वर्ग (रेफर) व तक्रार निवारण अधिकारी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतो दोषी कडून मोठी रक्कम घेऊन तक्रार कर्त्याच्या विरुद्ध निर्णय देतो. पन शंभर पैकी ९९ तक्रारी सत्य असतात.
गुरांचे गोठे गरजूंना कमी बोगस लाभार्थ्यांना अधिक गर्जुंचे गुरे पाण्यात राहतात.गुरांच्या गोठ्यात बोगस लाभार्थी राहतात.या साठी विहीरगाव (टांगा) यागवाचे उदा.घ्यावे हे सर्व बोगस काम खंडविकास अधिकारी यांच्या नजरे समोर होते पण त्या यावर आळा बसवत नाही. व A.C.B. धाड टाकते.
खंडविकास अधिकारी ५००रु आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत घेतो अशी चर्चा आहे.
डाटा एन्ट्री ऑपरेटर सुद्धा यात मागे नाही.
त्या मुळे या पंचायत समिती मधील B.D.O.अभियंते. डाटा एन्ट्री ऑपरेटर. व २०११ पासून तक्रार निवारण अधिकारी (जिल्हाधिकारी कार्यालय) यांची चौकशी व्हावी.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close