कुरळ पूर्णा येथील पूर्णामाय हॉलमध्ये ट्रायकोटर्मा प्रशिक्षण संपन्न
चांदुर बाजार / प्रतिनिधी
सिट्रस इस्टेट चांदूरबाजार यांच्या विद्यमानाने मूकबधिर आश्रम शाळा कुरळ पूर्णा तालुका चांदुर बाजार शेतकऱ्यांच्या बांधावर फार्म लॅब करून तयार करून अत्यंत कमी खर्चात जैविक खते औषधे निर्मिती बाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शेताचे उत्पन्न वाढ करणे करिता उत्पादन खर्च कमी करणे या सूत्राचा अवलंब करणे करिता प्रशिक्षण देण्यात आले सध्या रासायनिक औषधांमध्ये व खतामध्ये भरमसाठ वाढलेली महागाई व शेती उत्पादनाला मिळत असलेला भाव यामुळे शेती व्यवस्था यात उत्पन्न व खर्च नफा तोट्याचा ताळेबंद बसत नाही त्यामुळे शेती व्यवसायात तोट्यात आहे.यावर उपाययोजना म्हणून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जय किसान शेतकरी गट एरंडा तालुका वाशिम यांनी डॉ.संतोष चव्हाण शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जैविक खते औषधे निर्मिती करिता फार्म लॅब तयार करून उत्पादन खर्च कमी करण्याचा उपक्रम यशस्वी केला आहे सदर उपक्रम चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात राबविण्याबाबत कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षणामध्ये मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा अध्यक्ष सिट्रस इस्टेट चांदुर बाजार श्री राहुल सातपुते यांनी प्रस्तावना करून बांधावरील जैविक लॅबचे आवश्यकते बाबत मार्गदर्शन केले तसेच डॉ.संतोष चव्हाण सर यांनी अत्यंत कमी खर्चात बांधावरील प्रयोगशाळेत जैविक खते औषधे निर्मितीबाबत व या उपक्रमातून ग्रामीण रोजगार निर्मिती बाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी एरंडा येथील जय किसान शेतकरी गटाचे फार्म लॅब मध्ये शेतकऱ्यांकरिता जैविक खते औषधी निर्मितीची प्रशिक्षणाची व्यवस्था असल्याने प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले.तसेच मा.विभागीय कृषी सहसंचालक नागपूर श्री तोटावर यांनी सोयाबीन तूर,कापूस,संत्रा,केळी व मोसंबी या पिकावर जैविक खते औषधांचा वापर व उत्पादन वाढीसाठी होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले कार्यशाळेत अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व 41 शेतकऱ्यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळेतील जैविक खते औषधे निर्मितीचे प्रशिक्षणात सहभागी होण्याची तयारी दर्शवली.कार्यशाळेत सिट्रस इस्टेट चांदुर बाजार चे कार्यकारी समितीचे सदस्य श्री संतोषभाऊ किटुकले,श्री प्रफुल भाऊ नवघरे,श्री उद्धवरावजी बंड,श्री संदीप मोहोड,श्री पुष्पक भाऊ खापरे तसेच कार्यरत असलेले कु.दिपाली डमके व श्री पंकज चुनाडे व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सिट्रस इस्टेट शुद्धोधन वरघट यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचे आयोजन करिता अथक परिश्रम घेतले.कार्यशाळेचे संचालन श्री मनोज वानखडे सेवानिवृत्त कृषी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन पुष्पक भाऊ खापरे यांनी केले.*