सामाजिक
प्रा. अविनाश बेलाडकर यांच्या जन्म दिनी ” माझी वसुंधरा … माझे कर्तव्य …! ” अभियानांतर्गत वृक्षारोपण
मुर्तिजापूर (प्रतिनिधी ) नेहरु युवा केंद्र अकोला ( भारत सरकार ) द्वारा संचालित नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर आणि तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ” माझी वसुंधरा … माझे कर्तव्य …! ” या अभियानांतर्गत वेगवेगळे औचित्य साधुन मान्यवरांचे वाढ दिवस आणि सण पर्वावर वृक्षारोपण करुन हे अभियान राबविण्यात येते .
याच अनुसंगाने नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर चे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांच्या 61 साव्या जन्म दिवसी जांभुळाचे रोप लावण्यात आले .
यावेळी जेष्ठ पत्रकार दिपक जोशी , अजय प्रभे तिक्ष्णगत परिवाराचे मिलिंद इंगळे , सामाजिक कार्यकर्ते रोहित सोळंके , सुनिल वानखडे , पत्रकार मिलिंद जामणिक नेहरु युवा मंडळाचे अध्यक्ष अनिल डाहेलकर प्रामुख्याने उपस्थित होते .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1