मातृ शक्ती आर्वी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
आर्वी / भरत जयसिंगपूरे
मातृ शक्ती आर्वीने संयोजिका सौ. राधिकाताई विष्णुप्रसाद भारती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाकरे लेआऊट, आर्वी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे मत सौ. राधिकाताई यांनी व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, “झाडे जगली तरच शहराचे आरोग्य आणि पर्यावरण संतुलित राहील. प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक आहे.”
या कार्यक्रमात मातृ शक्ती आर्वी आणि दुर्गा वाहिनी आर्वीच्या अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. उपस्थित महिला सदस्यांमध्ये ताराबाई लांडगे, रीना खोडे, प्रतिभाबाई संभे, दीपाली शेंडे, मयुरी लोखंडे, सुषमा गोमासे, सुवर्णाताई भोंगाडे, चंदाताई लोखंडे, नीलिमाताई भुजाडे, गीताताई उंबरकर, लताताई परतेकी, रेखाबाई पांडे, सुनीताताई खोडे, पुष्पाताई बांगरे, शालिनी ताई ढोबळे आणि आशाताई ठाकरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचा उद्देश झाडांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे हा होता.