हरित सेना व हिवरखेड पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व श्रमदान संपन्न
वृक्ष लागवड म्हणजेच आयुष्याची जमापुंजी- ठाणेदार पांडव साहेब
बाळासाहेब नेरकर कडून
सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड व पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हरित सेनेच्या वतीने श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता हिवरखेड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयातील हरित सेना विद्यार्थी यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन परिसरात श्रमदान करून वृक्षांची लागवड केली व त्यांच्या संगोपनाचे पालकत्व स्वीकारले विद्यार्थ्यांचे हे कार्य पाहून हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडव साहेब यांना विद्यार्थ्यांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व तसेच प्रत्येक झाडाची माहिती दिली. श्रमदान करत असताना काळजी कशी घ्यावी याची सुद्धा माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण अकोला जिल्हा चे जिल्हा समादेशक डॉ. मयूर लहाने बिटचे जमदार महादेव नेवारे श्रीकृष्न सोळंके हे सुद्धा उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण या संदर्भात जन जागृती व्हावी हे सुद्धा उद्दिष्ट यावेळी संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आली