पांढरी खानमपूरचा श्रेयस दिलीप भोपळे सी.एस.आय.आर. नेट जे.आर. एफ. परीक्षा उत्तीर्ण
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील जनता सहकारी बँकेचे संचालक दिलीप भोपळे ह्यांचा मुलगा श्रेयश भोपळे ह्याने नुकत्याच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या सी. एस.आय.आर. नेट. जे. आर. एफ. परिक्षेत ऑल इंडिया रँक १९२ persentail ९८. ८४ % ने उत्तीर्ण झाला असून
त्याचे पूर्व शिक्षण हे एम. एस. सी. हे संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथून सुक्षम जीवशास्त्र विभागातून झाले असून, यापूर्वी त्याने सेट आणि गेट उत्तीर्ण केली आहे, यानंतर त्याला लाईफ सायन्स मध्ये रिसर्च करायचे असून, त्याच्या ह्या यशामुळे त्याचे सर्वञ कौतुक होत आहे
त्याचे यशाबद्धल नागार्जुना पान पिपरी उत्पादक संस्था अंजनगाव या संस्थेचे संचालक, जनता सहकारी बँक अमरावती चे संचालक ह्यांनी चिरंजीव श्रेयश भोपळे ह्यांचे अभिनंदन केले त्याच्या यशाबद्धल श्रेयश ह्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे