हटके

जिच्या साठी घेतली स्वेच्छा निवृत्ती तिने पार्टीतच सोडला जीव 

Spread the love

कोटा ( राजस्थान ) / नवप्रहार डेस्क

मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे. मृत्यू कोणाला कुठे आणि कधी गाठेल याचा नेम नसतो. याची प्रचिती देणारी घटना राजस्थान मधील कोटा येथे घडली आहे. पत्नीच्या आजारपणा मूळे पती ने स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्या आंदनात देण्यात आलेल्या पार्टीतच पत्नीने जीव सोडला.

कोटा येथील रहिवासी देवेंद्र संदल हे सेंट्रल वेअरहाऊसमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पत्नीच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी देवेंद्रच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनिमित्त एक छोटीशी पार्टी दिली, ज्यामध्ये त्यांची पत्नी दीपिकाही सहभागी झाली होती. देवेंद्र यांची रिटायरमेंट पार्टी सुरू होती, देवेंद्र आणि त्यांच्या पत्नीचे त्यांच्या मित्रांनी पुष्पहार घालून स्वागत केले. सर्वजण आनंदी होते आणि देवेंद्रला भविष्यासाठी शुभेच्छा देत होते.

पत्नीची काळजी घेण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या देवेंद्रने सांगितले की, ज्या पत्नीची सेवा करण्यासाठी तो हे सर्व करत होता, ती पत्नी आता काही क्षणांची पाहुणी झाली आहे, हे त्याला माहीत होते. रिटायरमेंट पार्टी दरम्यान सर्वजण एकमेकांशी बोलत असताना अचानक देवेंद्र यांच्या पत्नीला काहीशी अस्वस्थता जाणवली आणि ती खुर्चीवर बसली. त्याच्या जवळच्या खुर्चीवर देवेंद्रही बसला होता. मग अचानक पत्नी पुढे पडू लागली. Live video of death देवेंद्रने त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित लोकांनी पाणी आणण्यास सांगितले मात्र कोणी काही करण्याआधीच देवेंद्रची पत्नी त्याला सोडून निघून गेली. क्षणार्धात आनंदाच्या प्रसंगाचे दु:खात रूपांतर झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

 

 

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close