तळेगाव शा / विश्वेश्वर गुल्हाने
आज भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तळेगाव श्यामजी पंत ( जी.वर्धा) येथे सभा आयोजित केली आहे.
शहरातील चेतना मैदानावर सभेचे आयोजन दुपारी 3 वा.करण्यात आले आहे. मोदींजींच्या सभेसाठी भव्यदिव्य स्टेज उभारण्यात आला असुन रखरखत्या उन्हापासुन जनतेचे रक्षण व्हावे म्हणून जनतेची आसन व्यवस्था असलेल्या ठिकाणी वरून कापडी छत टाकण्यात आले आहे.
या व्यवस्थेची पाहणी लोकसभा उमेदवार रामदास तडस आणि आ.दादाराव केचे यांनी करून व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले. सभेला लाखोंच्या संख्येने लोकं येतील असे उमेदवार रामदास तडस यांनी स्थानिक प्रतिनिधींशी बोलतांना संगीतले.