मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिन व पत्रकार सन्मान सोहळा….
धामणगाव रेल्वे, / प्रतिनिधी
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघांतर्गत धामणगाव रेल्वे मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार ६ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार दिन व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हॉटेल श्रीनिवासा, परिवार रेस्टॉरंट श्री छत्रपती शिवाजी चौक, धामणगाव रेल्वे येथे सकाळी ११ वाजता आयोजित उपरोक्त कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार गोविंद वाकडे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कमल छांगाणी मार्गदर्शक एबीपी माझाचे ब्युरोचीफ प्रणय निर्वाण, दिव्य मराठीचे उपसंपादक अनुप गाडगे उपविभागीय अभियंता नरेंद्र वानखडे व धामणगाव चे ठाणेदार हेमंत ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी जेष्ठ पत्रकार मनीष मुंदडा यांचे सत्कार तसेच वृत्तपत्र विक्रेता नंदकुमार पहाडे, अक्षयसिंग ठाकूर, संदीप तायडे,जुगल माकडे यांचे सुद्धा स्वागत करण्यात येणार आहे उपरोक्त कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पवन शर्मा उपाध्यक्ष सतीश मुंदडा सचिव मंगेश भुजबळ सहसचिव राहुल गौतम व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे