आज अंजनगाव सुर्जी येथे चर्मकार समाजाचा जिल्हास्तरीय समाज मेळावा आयोजित
अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे)
राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याणमंत्री मा.बबनरावजी घोलप यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हा समाज मेळावा व पद नियुक्ती कार्यक्रम ५ मे रोजी दु. ०४:०० वाजता अंजनगाव सुर्जी येथील विठ्ठल मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला असून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या या जिल्हा मेळाव्याला चांदूरबाजार,अचलपूर,परतवाडा,धारणी,चिखलदरा,अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,भातकुली तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य शेषराव गव्हाळे व माजी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आसोले यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारणी पदे रिक्त केल्याची घोषणा नाशिक येथे केली होती.समाजातील तळागळातील समाज कार्य करणाऱ्या पुरुष-महिला,युवक-युवतींनी समाज कार्यास पुढाकार घ्यावा व समाजाला चालना मिळावी करिता या होणाऱ्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या समाज मेळावा व पद नियुक्ती कार्यक्रमाला माजी समाजकल्याण मंत्री यांच्या आदेशान्वये कोअर कमिटी नेमण्यात आली आहे.कोअर कमिटी यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी,तालुका कार्यकारणी करिता इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली असून या कोअर कमिटीचे प्रमुख रवींद्रजी राजुस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सर्व चर्मकार समाज बांधवानी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे