हटके

दुकानात घुसलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी तो दुकानात घुसला अन….

Spread the love

                   प्राणी आणि मनुष्याचे नाते अनादी काळापासून चालत आले आहे. जसे मनुष्य प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात तसे प्राणी देखील मनुष्यासोबत जीव लावतात.आपल्या मालकाला कोणी हात जरी लावले तरी प्राणी त्यांच्या रक्षणासाठी पुढच्या व्यक्तीच्या अंगावर चालून जातात.

आजकाल गैरसोय, गैरवर्तणूक किंवा अन्य गोष्टींमुळे काही प्राणी धोकादायक ठरू लागले आहेत. ते कधीही, कुठेही येऊन कोणावरही हल्ला करू लागले आहेत. प्राणी खवळले तर ते कोणालाही ऐकत नाहीत. प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका दुकानात म्हैस शिरल्याने दोन मित्रांची तारांबळ उडालेली असते. दुकानाचं शटर थोडं उघडं असल्याने दोन मित्र शटरच्या बाहेरून म्हैस नेमकी काय करतेय हे बघत असतात. म्हशीला दुकानातून हकलवण्यासाठी एक मित्र दुसऱ्याला म्हणतो की, ‘अरे घूस, काही नाही करत’ असं म्हणून दुसरा मित्र थोडसं शटर खोलून आत जातो.

दुकानात जाताच तो म्हशी समोर उभा राहतो. बैल दोन पावले मागे जातो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जोरात धावत येते. नशिबाने तो माणूस मागे सरकतो आणि आपला जीव वाचवतो. म्हशींचा रुद्रावतार पाहून घाबरगुंडी उडालेला मित्र जोरात शटर उघड असं ओरडतो आणि आपला जीव वाचवत तिथून बाहेर पळ काढतो.

हा व्हिडीओ @vk_reacts_daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘अरे घूस, काही नाही करत’ असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल १.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘भाऊ थोडक्यात वाचला’, तर दुसऱ्याने ‘या बाबतीत मित्रांवर विश्वास ठेवायचा नाही’ अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, ‘इसे कहते है मौत को छू कर टक से वापस आना.’

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close