क्राइम

कर्ज फेडण्यासाठी तगादा नकार देतात फोटो मॉर्फ करून न्यूड फोटो व्हायरल 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

               मायानगरी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न घेतलेल कर्ज फेडण्यासाठी महिलांना सतत कॉल येत होते. त्यामुळे त्यांनी रक्कम देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे समोरच्याने त्या महिलांचे फोटो मॉर्फ करुन ते न्यूड फोटो महिलांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात आले.  यक्बाद्दल माहिती होताच महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  या तिघंही महिलांनी वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज घेतले असल्याचे भासवत. यासाठी त्यांना धमकीचे फोन देखील आले होते. या तिघंही घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत. अंधेरी, जोगेश्वरी आणि मालाड येथील या महिला असून त्यांचे फोटो व्हायरल झाले हे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली आहे.

जोगेश्वरी येथील प्रकरण :

जोगेश्वरी येथील पीएस केवट (वय २७) याना ८ एप्रिल रोजी फोन आला यामध्ये समोरच्याने त्यांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली. कँडी अपवरून घेतलेले ३७०० रुपयांचे कर्ज फेडण्यास सांगितले. मी कधीही कर्ज घेतलेले नाही तरी मला एका तासात वेगवेगळ्या नंबर वरून २४ फोन आले. जेव्हा नकार दिला तेव्हा मॉर्फ केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्यात आले. हे प्रकरण ओशिवारा पोलीस हताळत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हायरल केलेल्या फोन नंबरचा मागोवा सायबर पोलीस घेत आहेत.

मालाड मधील प्रकरण :

मालाड येथील रहिवासी के एस यादव (वय २६) यांनी सांगितलं की, महिलांना देखील शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली आहे.मला फोन आल्यावर मी भावाला फोनवर बोलायला सांगितले त्यानंतर त्यांनी भावाला देखील शिवीगाळ केला आणि माझे फोटो मॉर्फ करून व्हायरल केले.

अंधेरी मधील प्रकरण :

अंधेरी येथील महिलेने सांगितले की, मला ६ एप्रिल रोजी एक लिंक आली त्यावर क्लिक केले, माझ्या संमती शिवाय खात्यात १८०० रुपये जमा झाले. मला प्रकरण नेमके समजले नाही. नंतर फोन आला की, तुम्ही घेतलेले १८०० रुपयांचे कर्ज परतफेड करा, मी विरोध केला तर माझे न्यूड फोटो नातेवाईकांना आणि पालकांना पाठवण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close