सामाजिक

वन्यप्राण्या मूळे शेतकर्‍याचे होनारे नूकसान थांबन्यासाठी झटका मशीन साठी अनूदान द्यावे

Spread the love

 

आमदार रणधिर सावरकर यांची लक्षवेधी*

बाळासाहेब नेरकर कडून

महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी क्रमांक ७ ला अनुसरून आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात वन्य प्राणी यांच्या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी व आर्थिक नुकसान याबाबत प्रश्न उपस्थित केला,

राज्यात बेसुमार वृक्षतोड झाल्याने वनक्षेत्र कमी होणे, वनक्षेत्र कमी होत असल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये शिरणे, वन्यजीव निवास व पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे तसेच शेतीमध्ये धाव घेत वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होणे, वन्य प्राण्यांचे मानवावर व पशुधनावर वाढते हल्ले होणे, याबाबतीत शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मांडणी केली, आमदार रणधीर सावरकरांनी वस्तुस्थिती मांडताना उदाहरणार्थ एकट्या अकोला जिल्ह्यात २०१६-१७ वर्षांमध्ये ३ हजार २५८ शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्याने वन विभागातर्फे १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली असली तरी मदत तोडकी आहे हे निदर्शनास आणून दिले,. नापिकी व पेस्टीसाईड च्या पिकांवर झालेल्या प्रादुर्भाव पेक्षा वन्य प्राण्यांमुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. आ. सावरकर यांनी हिमाचल प्रदेशाचे उदाहरण देऊन तेथील सरकारने माकडांना मारण्याचे संबंधी शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना वन्य प्रण्यामुळे होणारे नुकसाना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना झटका मशीन लावण्यासाठी शासनाने ३० हजार रुपयाचे अनुदान द्यावे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा डुक्कर व रोही यांना मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी. राज्याचे वनमंत्री ना. मूनगंटीवार यांनी सांगितले के महाराष्ट्र शासनाने सुद्धा वन्य डुक्कर व रोही यांना मारण्या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. मा. वन मंत्री यांनी आज विधानसभे प्रश्नाचे उत्तर देतांना सांगितले की आज दुपारी या संदर्भात बैठक बोलविण्यात आली असून त्या बैठकी मध्ये सर्व बाबींवर काय उपाय योजना करता येईल या बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
शेतीला कुंपण घालण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी पुर्ण आर्थिक अनुदानीत योजना शासनाने राबवावी तसेच नुकसान भरपाईची मर्यादा वाढवावी, सोबतच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना आयुधांचा पुरवठा करावा अशी ही मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close