हटके
गर्लफ्रेंड पासून पिच्छा सोडवण्यासाठी त्याने केले असे काही की सोशल मीडियावर तो होतोय ट्रोल

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
एका विशिष्ट वयात आल्यावर भिन्न लिंगाबद्दल आकर्षित होऊन प्रेमात पडणं ही नैसर्गिक बाब आहे. पहिल्याच नजरेतील प्रेम हे याच वयात होते. पण हे प्रेम पूर्णत्वास फार कमी प्रकरणात जाते. कारण किशोर वयात झालेल्या प्रेमावरून जसजसा वेळ निघत जातो. तसतशी तुम्हाला आपल्या पार्टनर च्या स्वभावाबद्दल त्याच्या आवडीनिवडीबद्दल माहिती होत जाते.त्यातील काही गोष्टी त्यांच्या पैकी एकाला आवडतात. काही गोष्टी दुसऱ्याला आवडत नाही. तसेच पार्टनर च्या काही गोष्टी आवडत नसल्याने मग ते दूर होण्याचा प्रयत्न करतात. पण त्यासाठी त्यांची हिम्मत होत नाही,.अश्या वेळेस ते अनेक क्लुप्त्यांचा अवलंब करतात. एका पार्टनर ने आपल्या महिला पार्टनर पासून दूर जाण्यासाठी जो मार्ग निवडला त्याबददल जेव्हा महिला पार्टनर ने सोशल मीडियावर येऊन खुलासा केला आहे. त्यानंतर तो व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंडशी संबंधित अशी एक गोष्ट सांगितली आहे, जी सर्वांनाच धक्कादायक वाटेल. त्याचं झालं असं, की एके दिवशी मुलीला तिच्या प्रियकराच्या आईच्या नंबरवरून अचानक मेसेज आला. त्यात त्यांचा मुलगा मरण पावल्याचं लिहिलं होतं. मेसेजमध्ये म्हटलं होतं, की तो घोडेस्वारी करत होता. अचानक तो घोड्यावरून पडला आणि घोडा त्याच्या छातीवर चढला. त्यामुळे त्याच्या हृदयाला इजा होऊन त्याचा मृत्यू झाला.
मुलीने सांगितलं की ती 5 दिवस तिच्या प्रियकराच्या मृत्यूच्या शोकात बुडाली होती. या बातमीचा तिच्या मनावर इतका वाईट परिणाम झाला की ती मेंटल हेल्थ हेल्पलाइनवर बोलू लागली. पण अचानक तिला तिच्या मित्रांकडून धक्कादायक गोष्ट कळली. खरं तर, मुलीच्या मित्रांना तिच्या प्रियकराच्या आईकडून आलेल्या मेसेजवर संशय आला. मग त्यांनी त्या मुलाच्या नंबरवर अनोळखी नंबरवरून फोन करायचं ठरवलं. फोन करताच मुलाने मुलाने हॅलो म्हणताच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेच फोन हिसकावून घेत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून मुलाने लगेच फोन कट केला. मात्र, त्याच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुलाने शेवटी पुन्हा मुलीशी संपर्क साधला आणि त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्याचं कारण सांगितलं. त्याने सांगितलं, की त्याला मुलीसोबत ब्रेकअप करायचा होता, पण त्याला तिला थेट तसं सांगता आलं नाही. जेव्हा मुलीने सोशल मीडियावर या गोष्टी लिहिल्या तेव्हा लोकांनी तिच्या प्रियकराला खूप ट्रोल केलं.