अखेर नितीन कदम यांच्यासमवेत अंजनगाव बारी गावकऱ्यांच्या पाठपुरावा यशस्वी
जिल्हा परीषद शाळेच्या विस्थापणेच्या प्रश्न निकाली
प्रतिनीधी / अमरावती
स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील अंजनगाव बारी परिसरात चावडी चौक येथील जिल्हा परीषद मुलींची कन्या शाळा बंद करून नवीन जागेवरती बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात जनारोष बघायला मिळाला होता. येथिल ग्रामीण परिसरात मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न,दळणवळणाची होणारी गैरसोय, रस्त्यांची दुर्दैवी अवस्था, व वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकाचा सामना मुलींना करावा लागत असल्या कारणाने येथील पालकवर्ग जुन्या जागेवरच शाळा बांधून देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. परिस्थीती चिघळन्याचा मार्गावर असताना नितीन कदम यांनी तात्काळ पालकवर्गाच्या आंदोलन स्थळी भेट देत शेकडोच्या समूहाला शांत केला होता. तणावपूर्ण वातावरण असताना नितीन कदम यांनी पालकांना शाळेसंदर्भातील अन्यायकारक प्रस्तावाला आपला विरोध प्रकट करतं झालेल्या पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीला जाब विचारत चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यावर व्यवस्थापनाच्या ११ पैकी ८ सदस्यांनी नितीन कदम व पालकाच्या मागणीला आपली सहमती दर्शविली. स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाला याविषयी विचारले असता शाळा व्यवस्थापन समितीच्या काहीं सदस्यांनी नवीन शाळा उभारणीच्या ठराव घेऊन तो प्रस्ताव ग्राम पंचायतला सादर केला असता मागणीनुसार स्थानिक प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. याविषयी अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे बघायला मिळत होती. म्हणुन नितीन कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच खडसावले होतें. शाळेच्या प्रस्तावित जागेसंदर्भात गावामध्ये एकच तणावाचे वातावरण बघायला मिळत होते. संपूर्ण वास्तविकता लक्षात घेऊन नितीन कदम यांनी जमाव शांत करतं लवकरच याबाबतचा पाठपुरावा करून शाळेचा प्रश्र्न निकाली लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. दरम्यान आता या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी उलटला असताना यावर सुधारित अध्यादेश पारित करतं जिल्हा परीषद शाळा आता आपल्या पूर्वरत ठिकाणी उभारण्याचे ठरवले आहे. यामुळे पालक वर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला. दरम्यान नितीन कदम सोबतच पालकवर्गाच्या या शाळेसंबधित यशस्वी पाठपुराव्याचे सर्वत्र परिसरातून कौतुक होतांना दिसून येत आहे.
हा शाळेच्या प्रस्तावित जागेच्या प्रस्तावाविरोधातील उभारलेला लढा आज आम्ही जिंकलो आहे. हा विजय फक्त माझा नसून यामध्ये पालकवर्गसुध्दा तेवढाच भागीदार आहे. जेव्हा अन्यायकारक बाबी माझ्या निदर्शनास येतील तेथे आमच्या आंदोलनाला ईथल्या व्यवस्थेने सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. व्यवस्थेने हुकुमशाही पद्धतीने वागण्याची पद्धत आता सोडावी आणि लोकशाही भावना अमलात आणावी नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलनं उभारू
नितीन कदम