शैक्षणिक
दीवंगत शिक्षकाच्या जयंती स्मरणार्थ विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व शाळेस अकरा हजारा रु भेट
घाटंजी ता प्रतिनीधी-सचिन कर्णेवार
शिक्षकाच्या शिकवणीतून विद्यार्थी घडतो तसाच शिक्षकाचे वागणूकीतून समाज ही घडतो. असेच समाजाला माणूसकीची शिकवण देणारी घटना घाटंजी तालुक्यातील पांढूर्णा बु. शाळेत पहावयास मिळाली. दिनांक 5/7/2024 ला पांढुर्णा बु.येथील दिवंगत शिक्षक स्व.श्री.नरेंद्र पांडुरंग पुनसे यांच्या स्मरणार्थ दीना निमित्ताने त्यांच्या परिवारा कडून माणूसकीचे शिक्षण देत विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व शाळेला रूपये 11,000 रोख भेट स्वरूपात त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आले.या प्रसंगी केंद्राचे केंद्र प्रमुख सुनिलजी बोंडे सर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.तर
शाळेच्या वतीने सौ.पुनसे ताईंचे पण साडीचोळी देऊन सांत्वन करण्यात आले.त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी,विद्यार्थी बहूसंखेनी उपस्थित होते.
००००००००००००००००००
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1