तिन्ही ग्रामपंचायत वर महीला राज

अचलपुर प्रतिनिधी — किशोर बद्रटिये -: अचलपूर तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निकाल आज तहसील कार्यालयाचलपूर येथे मतमोजणी दरम्यान जाहीर करण्यात आला यात देवगाव पिंपळखुटा निमदरी या तिन्हीग्रामपंचायत च्या महिलांच्या हाती आल्या असून तिन्ही ठिकाणी चुरशीची लढत बघण्यात आली .
प्राप्त माहितीनुसार अचलपूर तालुक्यातील देवगाव पिंपळखुटा निमदरी या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवार रोजी पार पडण्यात आल्या तहसील कार्यालयात मतमोजणी दरम्यान तिन्ही गावच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यात आदर्श ग्राम असलेल्या देवगाव ग्रामपंचायत वर साधुराम येवले गटाच्या परिवर्तन पॅनल ने एक हाती सत्ता मिळवत सरपंच पदीआशा गजानन येवले ह्या 615 मध्ये मिळवत विजयी झाल्या .तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या रेखा गजानन येवले यांना 439 मध्ये मिळाली .
तसेच निमदरी ग्रामपंचायत मध्येलक्ष्मी दादाराव काळेह्या 344 मध्ये घेत विजयी झाल्या असूनअलका रामदास सावलकर यांना 221 मते मिळाली .
पिंपळखुटा ग्रामपंचायत मध्येराधा गिरीधर शनिवारी यांना392 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्यासुशीला दहीकर यांना 242 मते मिळाली तिन्ही ग्रामपंचायत मध्ये अत्यंत चुरशीशी लढत बघण्यात आली असून तालुक्यात झालेल्या तिन्ही ग्रामपंचायत मध्ये महिलाराज आले आहे मतमोजणी दरम्यान अचलपूर तहसील कार्यालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मांडवे साहेबांनी कारवाई पार पाडली