सामाजिक
आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा येथे देविच्या बोकड्याच्या जेवणातुन ( मटणातुन ) १८ व्यक्तीना झाली विषबाधा
सर्व विषबाधित व्यक्तीची प्रकृती स्थीर
तहसीलदार वाहुरवाघ यांनी रुग्णालयात जावुन केली विषबाधीत व्यक्तीची विचारपुस
आर्णी:- आर्णी तालुक्यातील देऊरवाडी गटग्रामपंचायत मधे येत असलेल्या म्हसोबा तांडा येथे संतोष रामसिंग जाधव यांनी दिनांक २१ /५/२०२४ रोजी समाजीक परपंरेने देविचा नवसाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या दिवसाच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर कोणालाही विषबाधा झाली नाही परंतु काल कापलेल्या बोकड्याचे काही मटन उरल्याने ते रात्रभर झाकुन ठेवले होते आणी तेच मटन दुस-या दिवशी बनविल्याने याच उरलेले मटन खाल्याने परागावातील ९पाहुनेमंडळींना तर गावातील एकुन १८ लोकांना या सकाळी बनविलेल्या मटनाच्या अन्नातुन विषबांधा झाल्याने सदर काही महिलांना मटन खाताच मळमळ होत असल्याचे सांगीतले आणखी काही व्यक्तीना मळमळ उलट्या होत असल्याचे लक्षात येताच गावातील नागरीकांनी लगेच क्षणाचाही विलंब न करता त्यांना आर्णी ग्रामिण रुग्णालयात उपचार्थ आणण्यात आले सर्व विषबाधीत व्यक्तीवर डॉक्टर सुनिल भवरे व रुग्णालयातील चमु डॉक्टरांनी भर्ती रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार केले असुन आता सर्व विषबांधीत व्यक्तीची लहान मुले महिलांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टर सुनिल भवरे यांनी सांगितले आहे
आज दिनांक २२/३/२०२३ रोजी दुपारी २ वाजताच्या Honestly आर्णी तालुक्यातील देऊरवाडी गटग्रामपंचायतीमधिल म्हसोबा तांडा येथे देविच्या नवसाचे शिळे मटन खाल्याने त्यातुनच सर्व व्यक्ती व महीलांना लहान मुलांना विषबाधा झाली सर्वाची आरोग्य तपासणी केली असता सर्वाची प्रकृती स्थीर असल्याचे डॉ सुनिल भवरे यांनी सांगीतले
*कर्तव्यदक्ष तहसीलदार वाहुरवाघ यांची विषबाधीत रुग्णासहीत प्रत्येक्ष घटणास्थळी भेट*
आर्णी तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांना आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा व अंजीनाईक येथिल ३ चिमुकल्या मुलींना देविच्याच बोकड्याच्या मटन जेवनावळीच्या कार्यक्रमातुन विषबाधा झाल्याने कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी आर्णी तालुक्यातील दोन गावात घरगुती कार्यक्रमातुन विषबाधा झाल्याने त्यांनी लगेच आर्णी ग्रामिण रुग्णालयात जावुन भर्ती असलेल्या रुग्णाची प्रत्यक्ष चौकशी करुन त्यांना धिर दिला व येथिल वैद्यकीय अधिक्षक डॉ सुनिल भवरे यांच्याशी चर्चा करुन त्यांनी म्हसोबा तांडा या घटणास्थळी भेट देत ज्या व्यक्तीकडे कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांच्या घरी प्रत्येक्ष उपस्थित असलेल्या महिला व गावकरी यांना अधिकची माहीती घेत त्यांना आणी कोणत्या गावातील व्यक्ती असेल तर त्यांना सुध्दा आरोग्याची तपासणी करुन घेण्याच्या सुचना दिल्या सदर गावात लोहनबेहळ येथिल प्राथमिक वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे पथक घटणास्थळी दाखल झाले होते त्यांना पण तहसीलदार वाहुरवाघ यांनी सुचना केल्या.
देविजवळ ठेवलेल्या मटणातुनच विषबाधा – सदर कापलेले बोकड्याचे मटन हे रात्रभर देविच्या पुढे नैवेद म्हणुन ठेवण्यात आले तेच मटन सकाळी ११ वाजताच्या दर्म्यान पाहुने मंडळीला करुन खाऊ घातल्याने यातुनच विषबाधा झाली असल्याचे प्रत्येक्ष आयोजकांच्या घरी जावुन त्यांच्या घरातील महीलांनी सांगीतले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1