तिला घरातून यायचे विचित्र आवाज : सत्य समोर आल्यावर
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया ऑनलाईन
तुम्ही दिवसभर कष्ट करून घरी आला आहात. छान जेवण झाल्यावर तुम्ही मस्तपैकी झोपण्याच्या मुड मध्ये आहात. झोपण्यासाठी तुम्ही अंथरुणावर पडतात. काही क्षणात तुम्ही निद्रादेवीच्या बाहुपाशात जाण्याच्या तयारीत आहात आणि तुम्हाला विचित्र आवाज ऐकू येतात. अश्या वेळी महिला तर सोडा पुरुष देखील घाबरून जाईल. महिलेला घरातून विचित्र आवाज येत होते. तिने शोध घेतला असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची आहे.
येथे राहणाऱ्या अॅशले गार्डिनो नावाच्या एका महिलेला रात्री झोप येत नसायची, कारण तिला तिच्या घराखाली काहीतरी विचित्र आवाज यायचे. हे आवाज छतावरून येत असावेत, असं तिला वाटलं, पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा तिला धक्काच बसला., त्याच रात्री असं घडलं की सगळेच हादरलेमहिलेनं टिकटॉकवर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ बनवला असून तिच्यासोबत घडलेली एक विचित्र घटना सांगितली आहे. महिलेनं सांगितलं की, काही दिवसांपासून हे आवाज ऐकू येत होते.
मग एक दिवशी मी माझ्या घराच्या दारात उभं राहून पाहिलं, तर गवत हलत होतं आणि त्यातून एक माणसासारखा हात दिसत होता. सुरुवातीला ती घाबरली, मग तिने पाहिलं की कोणीतरी घसरून तिच्या दरवाजाजवळच्या मोठ्या छिद्रातून आत शिरलं. हे खूप भयानक आणि विचित्र होतं, म्हणून तिने पोलिसांना बोलावलं.महिलेनं पोलिसांना बोलावले तेव्हा त्यांनी या होलमध्ये घुसलेल्या माणसाला बाहेर पडण्यास सांगितलं. तो कसा तरी रांगत बाहेर आला आणि मग समजलं की तो महिलेच्या घराखाली असलेल्या या होलमध्ये अनेक महिने राहात होता.
महिलेला त्याचा आवाज ऐकू यायचा. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पण तेव्हापासून ती महिला शांतपणे झोपू शकली नाही. ज्या लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे त्यांनी कमेंटमध्ये असंही लिहिलं की, हे पाहिल्यानंतर ती कधीच त्या घरात शांतपणे झोपू शकत नाही.




