ती खेळा खेळात झाली गर्भवती

यवतमाळ / विशेष प्रतिनिधी
अल्पवयीन मुला-मुलीने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून संबंध ठेवल्यानं मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार घडला आहे. अल्पवयीन लहान मुलं सोबत खेळतात यामुळे कुटुंबातील कुणालाच संशय आला नाही. पण अचानक मुलीच्या पोटात दुखायला लागले. तिला उलट्या सुरू झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आलं.
इंटरनेट मुळे एकीकडे जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती एका क्लिक वर उपलब्ध होत आहे. देशाला डिजिटल करण्यासाठी स्वस्तात नेट सुविधा मिळत आहे. पण कुठल्याही सुविधेचा फायदा घेण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करण्याची जनतेची जी सवय आहे त्याचा प्रत्यय अनेक वेळा पाहायला मिळतो. इंटरनेट मुळे सोशल मीडिया वर घडामोडी पाहायला मिळतात. पण अल्पवयात मोबाईल हातात आल्याने आणि इंटरनेट वर अश्लील साहित्य विना परिश्रमाचे उपलब्ध होत असल्याने तरुण आणि किशोरवयीन पिढी वाम मार्गाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण तर सोडा किशोरवयीन मुले देखील कशी वाम मएगकडे वळत आहे याचे उदाहरण शहरात पाहायला मिळाले.
काका- मामा – आत्या अशी नात्यात येत असलेल्या कुटुंबातील मुले सोबत खेळत असतात. मुले समवयस्क असल्याने किंवा त्यांच्यात 1 – 2 वर्षाचे अंतर असल्याने कुटुंबीय त्याच्या हलचालीकडे लक्ष देत नाहीत. समवयस्क मुले सोबत खेळत असताना त्यांनी मोबाईल वर अश्लील व्हिडीओ पाहून संबंध ठेवले. त्यात मुलगी तीन महिन्याची गर्भवती राहिली. आता हे सगळे समजायचे वय नसल्याने तिच्या काहीच लक्षात आले नाही.
एकदिवस तिला मळमळ।होत असल्याने आणि पोटात दुखत असल्याने तिला कुटुंबीयांनी डॉक्टर कडे नेले. डॉक्टरांनी औषध दिले.पण त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी काढण्याचा निर्णय घेतला. सोनोग्राफी चे रिझल्ट पाहून डॉक्टर अवाक झाले.त्यांनी ही बाब कुटुंबियांना सांगितली. सुरवातीला कुटुंबीयांचा डॉक्टर च्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण शेवटी त्यांना डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला.
मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन जेव्हा विचारले तेव्हा तिने आईजवळ सगळा प्रकार संगीतला. मुलीने सांगितले की ती आणि तिचा मामे भाऊ मोबाईल वर अश्लील साहित्य पाहत होते. आणि त्यांनी व्हिडीओ पाहून संबंध बनवले. मुलीच्या तोंडून हकीकत ऐकून आईने तिला घेऊन पो.स्टे. गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीच्या मामे भाव विरोधात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.