सामाजिक

पिंपरी जलसेन च्या संजीवनी शिक्षण संस्थेच्या ग्रामीण बहु उद्देशिय विद्यालयाची १० वी च्या परीक्षेत यशस्वी परंपरा कायम

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पिंपरी जलसेन येथील संजीवनी शिक्षण संस्थेच्या ग्रामीण बहु उद्देशिय विद्यालयाचा १० वी चा निकाल सलग ४ थ्या वर्षी चाही शेकडा १०० टक्के लागला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गितांजली ताई शेळके यांनी दिली आहे .
पिंपरी जलसेन सारख्या ग्रामीण भागात असलेले हे विद्यालय हे शैक्षणिक दृष्ट्या उत्कृष्ठ आहे . या विद्यालयातील प्रथम क्रमांक जाधव सदिच्छा संदीप शेकडा ९५ टक्के ,
द्वितीय क्रमांक थोरात पायल पाडुरंग शेकडा ९४ टक्के ,तृतीय क्रमांक बोरुडे सर्वेश दादाभाऊ शेकडा ९३ .२० टक्के , चतुर्थ क्रमांक वाढवणे निकीता शहाजी शेकडा ९२ .२० टक्के, पाचवा क्रमांक घेमुड प्रांजल संपत शेकडा ८६ .६० टक्के या विद्यार्थ्यांनी उच्चांकी गुण मिळवून यश संपादन केले आहे .
तर गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवलेले विद्यार्थी इंग्रजी विषयात १०० पैकी ९३ गुण, विज्ञान विषयात १०० पैकी ९३ गुण मिळविले असून शेकडा ९० जास्त गुण मिळवणारे ४ विद्यार्थी आहे . शेकडा ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे ६ विद्यार्थी असून शेकडा ७० पेक्षा जास्त गुण मिळवणारे ३ विद्यार्थी आहेत .शेकडा ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे ६ विद्यार्थी हे शेकडा ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे ४ विद्यार्थी आहेत , अशी माहिती
अध्यक्षा श्रीमती गितांजली ताई शेळके दिली आहे .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी , मुख्याध्यापक , शिक्षक , कर्मचारी व ग्रामस्थ यांनी कौतूक करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close