शाशकीय

ISIS  शी संबंध असलेल्या तीन तरुणांना अटक

Spread the love

NIA ने घेतले ताब्यात 

 नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क   

      आयसिस या जहाल दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तीन युवकांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई  गुप्तचर विभागाच्या नेतृत्वात मध्य प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकासोबत करण्यात आली आहे. जबलपूर येथे केलेल्या संयुक्त कारवाईत 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यात तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

सैयद मन्सूर अली, मोहम्मद आदिल खान व मोहम्मद शाहीद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांना भोपाळ येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या प्रवक्त्याने दिली. अनेक धारदार शस्त्रे, बंदी घातलेल्या बोअरसह दारूगोळा, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे या छाप्यांमध्ये जप्त करण्यात आल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. खान याच्या आयसिसधार्जिण्या कारवाया गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एनआयएच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यांचा तपास केल्यानंतर या यंत्रणेने 24 मे रोजी गुन्हा दाखल केला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close