सामाजिक

सहलीसाठी आलेले तीन तरुण समुद्रात बुडाले ; दोघांना वाचविण्यात यश

Spread the love

सिंधुदुर्ग / नवप्रहार मिडिया 

                  सहलीसाठी आलेल्या आणि समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या 11 तरुणांपैकी तीन तरुण समुद्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे तर य3क तरुण बेपत्ता आहे. तरुण कणकवली येथील असल्याचे समजते. सुफीयाज दिलदार शेख (२४) असे मेउत टाफूनचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साकेडी मुस्लीमवाडी कणकवली इथले शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसंच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारुण शेख, अरबाज इम्तियाझ शेख, शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ असे एकूण 11 जणं मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी दुचाकीनं तारकर्ली पर्यटन केंद्र इथं आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते समुद्रात उतरले. यातील सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरल्यावर ते वाहून जात असल्याचं पाहून साहिल शेख आरडा ओरडा करू लागला. साहिलचा आवाज ऐकताच सर्वजण त्या दिशेनं गेले. मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. त्यांनी अरबाज शेखला पाण्यातून बाहेर काढलं. त्यावेळी मतीन हा बुडू लागला असता, पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर आला. मात्र, सुफियान हा समुद्राच्या पाण्यात वाहून गेला. बराच वेळ त्याचा शोध सुरु होता. मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. तो अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात : पाण्यात बुडालेल्या अरबाज व मतीन या दोघांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र, अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सुनील जाधव, सुभाष शिवगण, धोंडू जानकर व अन्य घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close