ब्रेकिंग न्यूज
शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तीन एकरातील ऊस व ३० ३० पाईप जळून खाक
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी ऐवजपूर शेत सर्वे न ९३/२ मधील शेतकरी अंबादास नारायण अस्वार ह्यांचे तीन एक्कर उभा असलेला ऊस अंदाजे किंमत ३ लाख रुपये, व ३० स्प्रिंकलरचे पाईप हे शेतातील बाजूने गेलेल्या विधुत लाईनचे तारांचे घर्षन झाल्याने तीन एकरातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला, त्यामुळे आधीच शेतकऱ्याची परिस्थिही बेकार असतांना पुन्हा नुकसान झाले त्यामुळे शेतकरी अंबादास आस्वार ह्यांनी आपले जीवन कसे जगावे हा त्याचे समोर प्रश्न निर्माण झाला आहे
जळालेल्या पिकाची पाहणी विज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी केली असून विज वितरण कंपनी त्यांना काय मदत करणार ह्याकडे त्याचे लक्ष लागले आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1