धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
जिल्हाक्रीडा विभागीय तर्फे आयोजित तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये रग्बी ही स्पर्धा राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे बालेवाडी पुणे. येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये आपल्या विद्यालयाचे वयोगट 17 मुलं मुली वयोगट 19 मुली खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. खेळ स्पर्धेच्या वेळी चांगली झुंजवत खेळ खेळून त्यांना अपयश आलं पण धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से. फ. ला. हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाच्या मुली इथेच थांबले नाही त्यांनी राष्ट्रीय रग्बी संघा करिता निवड चाचणी मध्ये आपल्या विद्यालयाचे धामणगाव नगरीचे नाव कोरलं व आपल्या विद्यालयातून तीन मुली होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी संघात सहभाग नोंदविला आहे. आपल्या शाळेतील तीन विद्यार्थिनींचे या राष्ट्रीयस्तरा करिता या चाचणीमध्ये निवड झाली. विद्यार्थिनींचे नाव
वंशिका जोशी (वर्ग 9 वा), कृतिका बढीये (वर्ग 9 वा)
निधी निंभोरकर (वर्ग 12 वी विज्ञान)
राष्ट्रीय स्तराकरिता विद्यार्थी नियुक्ती झाल्यामुळे नंतर बिहार पटना इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय संघ मध्ये सहभाग घेऊन शाळेचे नाव व आपल्या राज्याचे नाव नक्कीच उंच करतील..खेळाचे मार्गदर्शक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक सौरभ पांडेय,शोगन धांदे, शोभेराम जावरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे स्थान मिळवले..
विद्यार्थ्यांचे या यशस्वी वाटचाली करता विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रदीप मानकर,पर्यवेक्षक अनिल लाहोटी तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे…