क्राइम

लॉज च्या रूम मध्ये आढळले तीन मृतदेह ; मृत्यूला घेऊन शांशकता 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

              अनेक लोकं भ्रमंतीला आले की हॉटेल मध्ये थांबतात. काही वेळा लॉज मध्ये थांबलेले लोकं आत्महत्या करतात.किंवा त्यांचा खून केला जातो.अरुणाचल येथील हॉटेल च्या रुम मध्ये तीन लोकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे,. तीन मृतदेहापैकी दोन महिलांचे तर एक पुरुषाचा आहे. या घटनेने पोलीस देखील चक्रावले  आहेत. आणि त्यांनी सर्वच अँगल ने तपास  सुरू केला आहे. पोलिसांना हा प्रेम त्रिकोणाचा प्रकार असल्याची शंका आहे,.

 इथे एका हॉटेलमध्ये केरळचे तीन लोक मृतावस्थेत आढळून आले, त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की, केरळमधील कोट्टायम येथील नवीन थॉमस (वय 39) हे तिरुवनंतपुरम येथील रहिवासी पत्नी देवी बी (39) आणि आपली मैत्रीण आर्य बी नायर (29) यांच्यासोबत 28 मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते.

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून तिघेही दिसत नव्हते आणि मंगळवारी पहाटे त्यांना संशय आल्यावर कर्मचारी तपासणी करण्यासाठी गेले. यावेळी रूम आतून बंद असल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, “जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिन्ही लोक मृतावस्थेत आढळले”. नायरचा मृतदेह पलंगावर होता, तिचं मनगट ब्लेडने कापलेलं होतं, तर देवी बी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. त्यांच्याही मनगटाच्या उजव्या बाजूलाही कापल्याच्या खुणा होत्या.
डाव्या हाताच्या मनगटावर जखमेच्या खुणा असलेला थॉमस वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळला. अधिकाऱ्याने सांगितलं की, शवविच्छेदन अहवाल आज अपेक्षित आहे. या गूढ घटनेची सर्व संभाव्य पैलू लक्षात घेऊन कसून चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तिरुअनंतपुरममध्ये नायर बेपत्ता असल्याची एफआयआर नोंदवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close