कोचिंग क्लास चालवणाऱ्या तीन भावंडानी केले लैंगिक शोषण

बाल विकास केंद्रात झाला प्रकार उघड
दक्षिण मुंबई / नवप्रहार डेस्क
१५ वर्षीय मुलीने शाळा बद्दलल्याने नवीन शाळेत तिचे मित्र कमी होते. आणि ती शिक्षकांशी कमी बोलत असल्याने ती अभ्यासात माघारत होती त्यामुळे अभ्यास कव्हर करण्यासाठी तिने कोचिंग क्लास लावले. सदर कोचिंग क्लास तीन भावंड चालवत होते. या तिन्ही भावंडा कडून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. तिने ही बाब आईला सांगितली नाही. पण तिच्या वागण्यात बदल पाहून आईला शंका आली. त्यामुळे तिला बाल विकास केंद्रात नेण्यात आले. तिथे तिचे समुपदेशन सुरु असतांना समुपदेशकाला तिने ही बाब सांगितली.
मुलीच्या आईला हा प्रकार सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. पण भीतीपोटी तिने असहमती दर्शवली. त्यानंतर बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की कोचिंग क्लास चालवणाऱ्या तिन्ही भावंडाणी तिचे लैंगिक शोषण केले.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईत ही घटना घडली आहे. कोचिंग सेंटर मध्ये मला लेक्चर सुरू होण्याआधी लवकर बोलवलं जायचं. त्यानंतर क्लास संपल्यावर देखील जास्त वेळ थांबवून उशिरा सोडलं जायतं. तिन्ही सरांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचं या मुलीने म्हटलं आहे.
बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून या मुलीचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी तिने या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजताच बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन भावांना अटक केलीये. तर मोठा भाऊ अद्याप फरार आहे.
तिन्ही भाऊ २४, २५ आणि २७ या वयोगटातील आहेत. ते दक्षिण मुंबईत राहतात आणि एक कोचिंग सेंटर चालवतात. येथे ७वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांचा क्लास घेतला जातो. यामध्ये ३५ ते ४० मुली शिक्षण घेतात.
२०२२ मध्ये या मुलीच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यामुळे ती आपल्या आईसह राहत होती. यावेळी तिने नवीन शाळेत प्रवेश घेतला. शाळा नवीन असल्याने ती जास्त टिचर्ससह बोलत नव्हती तसेच अन्य विद्यार्थ्यांशी सुद्धा कमी बोलायची. त्यामुळे अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी तिने कोचिंग सेंटर देखील लावलं होतं. काही दिवसांनी तिच्या आईला मुलीच्या वागण्यात बराच बदल जाणवला. त्यामुळे २०२३ मध्ये बाल विकास केंद्राशी संपर्कसाधत तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले. काही दिवसांनी तिने येथे जाणे बंद केले.
त्यानंतर पीडिता पुन्हा फेब्रुवारी २०२४ मध्ये येथे दाखल झाली. यावेळी तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती दिली. तसेच बदनामीच्या भीतीने आपल्या आईला याबद्दल काही सांगू नये असं म्हटलं. मात्र त्यांनी तिच्या आईला सांगितले. आईला सांगितल्यावर भीतीने आईने देखील पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.