साधू संतांचे विचार मानवी जीवनास पोषक –राजु देवतळे
कन्हाळगाव येथे संत सावजी महाराज पुण्यतिथी संपन्न
चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा विकास कामाचा विकास रथ मतदार संघात सुरू असून जनकल्याणकारी योजना मतदार संघात प्रभावी पणे राबविल्या जात आहे. विकासाचा एक भाग म्हणून त्यांनी कांपा चिमूर वरोरा या रेल्वे लाईन ला मान्यता मिळवून दिली आहे त्यामुळे या मतदार संघात औधोगिक क्रांती आमदार बंटीभाऊ भांगडिया केल्याशिवाय राहणार नाही असे भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे सांगत पुढे म्हणाले की साधू संतांचे विचार गाव उन्नती तारक ठरतील.त्यामुळे गावात भजन सप्ताह चे धार्मिक कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून साधू संतांचे विचार मानवी जीवनास पोषक राहतील असे त्यांनी पुण्यतिथी प्रसंगी व्यक्त केले. कन्हाळगाव गावात अनेक विकास कामे सुद्धा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून झाली असल्याचे सुद्धा सांगितले.
कन्हाळगाव येथील संत सावजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात राजू देवतळे बोलत होते.यावेळी सरपंच विजय घरत,येरखेडा सरपंच गेडाम, स्वप्नील भुसारी बळीराम भाकरे,दिलीप घरत उपस्थित होते.
मोठया प्रमाणात महिला पुरुष भाविक उपस्थित होते. १८ गावातील भजन दिंड्या उपस्थित होत्या