हटके

तुम्ही हॉटेलमध्ये थांबत असाल तर ही काळजी नक्की घ्या !

Spread the love

                सध्या मुलांना शाळेच्या सुट्या लागल्या आहेत. सारखे शाळेत जाऊन अभ्यास आणि होमवर्क करून मुले बोर होतात. सुट्या आल्या की  आई बाबांनी कुठे तरी फिरायला न्याव अशी त्यांची इच्छा असते. तर सारखे तेच ते काम करून कंटाळलेले आई बाबांना देखील चार दिवस कुठे फिरून यावं अस वाटत.

             फिरायचा प्लॅन आखला की तिथे पोहचल्यावर उगाच त्रास होऊ नये म्हणून लोक ऑनलाइन हॉटेल बुक करतात. तुम्ही प्रवास करून थकलेले असतात. त्यामुळे हॉटेल मध्ये येताच एकतर आराम करण्याचा विचार करतात. किंवा हॉटेल परिसर फिरण्याचा. नवीन लग्न झालेले जोडपे देखील पर्यटनस्थळी मधुचंद्रासाठी जातात. अशा वेळी ते वेगळ्या मूड मध्ये असल्याने फार काही काळजी घेत नाही. त्यामुळे त्यांना भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.  नवीन ठिकाणी गेल्यास काही काळजी जर घेतली तर आपण त्या पासून वाचू शकतो.   कारण काही ठिकाणी खोल्यांमध्ये लपवलेले कॅमेरे बसवले गेलेले असण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत काळजी घेणं आणि आवश्यक ती खबरदारी घेणं फार महत्त्वाचं ठरतं.

तुमचा स्मार्टफोन हाच अशा धोका टाळण्याचं प्रभावी माध्यम ठरू शकतो. अनेकांना माहिती नसते, पण स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही लपलेले कॅमेरे सहज शोधू शकता. यासाठी काही सोप्या ट्रिक्स तुम्हाला उपयोगी पडतील.

१. सर्वप्रथम, खोलीतील लाईट बंद करा आणि तुमच्या स्मार्टफोनचा टॉर्च ऑन करा. नंतर आरसे, एअर व्हेंट्स, घड्याळ, लाइट फिटिंग्ज अशा ठिकाणी टॉर्चचा प्रकाश टाका. लपवलेल्या कॅमेऱ्यांच्या लेन्समुळे प्रकाश परावर्तित होतो. जर कुठे चमकणारा बिंदू दिसला, तर तिथे कॅमेरा असण्याची शक्यता असते.

२. प्लेस्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर ‘Hidden Camera Detector’, ‘Spy Camera Finder’ अशा अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स तुमच्या फोनमधील सेन्सर वापरून मॅग्नेटिक फील्ड, इन्फ्रारेड लाइट आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सचा शोध घेतात. यामुळे लपवलेले कॅमेरे स्कॅन करता येतात.

३. काही वायरलेस कॅमेरे Wi-Fi किंवा Bluetooth नेटवर्कशी जोडलेले असतात. तुमच्या स्मार्टफोनच्या Wi-Fi किंवा Bluetooth सेटिंग्समध्ये जाऊन पाहा की, कोणते डिव्हाइसेस कनेक्ट आहेत. अनोळखी किंवा अजीब नावांचे डिव्हाइसेस (उदाहरणार्थ – IP_CAM_XXXX) आढळल्यास ते लपलेले कॅमेरे असू शकतात.

४. अनेक छुपे कॅमेरे IR लाइट वापरतात, जो मानवी डोळ्यांना दिसत नाही, पण स्मार्टफोन कॅमेराने तो ओळखता येतो. खोलीतील लाईट बंद करून कॅमेरा अ‍ॅप चालू ठेवा आणि संशयित भागात स्कॅन करा. जर स्क्रीनवर लहान फ्लॅश किंवा ठिपक्यासारखे काही दिसले, तर तो IR लाइटचा संकेत असू शकतो.

५. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा गोष्टींबाबत नेहमी जागरूक रहा. हॉटेलची खोली कितीही प्रतिष्ठित असली तरीही तुमच्या गोपनीयतेसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. कोणत्याही संशयास्पद गोष्टी दिसल्यास, त्वरित हॉटेल व्यवस्थापन किंवा स्थानिक पोलिसांना कळवा.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close