हटके

ती नैसर्गिक प्रक्रिया तिच्यासाठी ठरली जीवघेणी

Spread the love

बायको च्या भडकवण्या वरून घडली घटना

उल्हासनगर  / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                    मानवी काही शरीरात काही बदल हे एका विशिष्ट वयानंतर नैसर्गिक रित्या घडत असतात. मुलांना जशी एक विशिष्ट वयानंतर दाढी मिशी येते तसेच मुलींना मासिक पाळी येते. पण हीच नैसर्गिक बाब एका 12 वर्षाच्या मुलीसाठी जीवघेणी ठरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात १२ वर्षीय मृत मुलगी ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनी सोबत राहत होती. तर तिचे आईवडील गावी राहतात. या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी आली. मात्र ते पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती दिली. (तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं वहिनीने सांगितलं. त्यामुळं या मुलीचा मोठा भाऊ संतापला आणि तब्बल तीन दिवस त्याने बहिणीचा अनन्वित छळ केला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (

हा छळ सहन न झाल्यानं या १२ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर भावाने स्वतःच तिला  जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर तिचा पोस्टमॉर्टम केला असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळं डॉक्टरांनी (Doctor) याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी (Police) या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close