राजकिय

शिवसेना (UBT ) गटाच्या अडचणी वाढणार ? हे आहे कारण

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                       निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यावर राजकीय घडामोडींना वेग आलाय . महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून रस्सीखेच सुरु असताना आणि काँग्रेस व शिवसेना (UBT) गट यात तणावाचे वातावरण असताना ठाकरे यांच्या साठी एक वाईट बातमी आली आहे.  संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेमधील युती तुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार आहे.

शिवसेना ठाकरे गटासोबत अडीच वर्षे असणारी युती संभाजी ब्रिगेड तुटणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संभाजी ब्रिगेडसाठी असणाऱ्या जागांवरती उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत असणारी अडीच वर्षांची युती तोडणार आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे भूमिका जाहीर करणार आहेत.

संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगे यांच्याबरोबर जाणार आहेत. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

:

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close