क्राइम

भर रस्त्यात सेनेच्या नेत्यावर तलवारीने सपासप वार

Spread the love

               हॉस्पिटल मध्ये कार्यक्रमासाठी  आलेल्या शिवसेनेच्या नेत्यावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या 3 ते 4 लोकांनी ते कार्यक्रम आटपून बाहेर पडताच त्याच्यावर सपासप वार करणे सुरू केले. मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा अंगरक्षक होता . त्याच्याजवळ गन सुद्धा होती. पण त्याची गन पहिलेच हिसकावून घेण्यात आली होती. याच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

संदीप थापर सिविल हॉस्पिटलमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी याठिकाणी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर आले. तेव्हा त्यांची वाट पाहात बसलेले ३-४ निहंगांनी त्यांच्यावर हल्ला केला.

सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तीन लोक स्कुटीवर आलेले दिसत आहेत. रस्त्यावर गर्दी आहे. अशावेळी आरोपी तलवार काढून थापर यांच्यावर हल्ला करतात. त्यांच्यावर चार-पाच वेळा सपासप वार केले जातात. रस्त्यावरील काही लोक आरडाओरड करतात. अशावेळी तीन लोक स्कूटीवर बसून निघून जातात. सदर व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

माहितीनुसार, थापर हे खलिस्तान विरोधात बोलत असतात. त्यांनी पंजाबमधील शेतकरी आंदोलनाविरोधात देखील भाष्य केलं होतं. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा गनमॅन देखील होता. पण, त्याचे शस्त्र हिसकवण्यात आले होते. थापर यांच्या निकत्वर्तीयांच्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांना धमकी मिळत होते. त्यामुळे त्यांना एक अंगरक्षक देण्यात आला होता.

याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी टीम स्थापन करण्यात आली आहे. कोणालाही सोडण्यात येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close