आरोग्य व सौंदर्य

आपणही केसांवर करत असाल ट्रीटमेंट तर व्हा सावधान 

Spread the love

ही बातमी वाचल्यावर आपणही ब्युटीपार्लर मध्ये जाण्याआधी कराल 10 वेळा विचार 

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

महिला स्वतःच्या सौंदर्याची फार काळजी घेतात. त्यासाठी त्या नियमित ब्युटीपार्लर मध्ये जातात. पार्लर  मध्ये पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत ट्रीटमेंट केली जाते. पीडित महिला की केस स्मूथ आणि सरळ करण्यासाठी ब्युटीपार्लर मध्ये गेली होती.पण त्यानंतर तिला जो त्रास झाला ते ऐकून तुम्ही देखील ब्युटीपार्लर मध्ये जाण्याआधी 10 वेळा  विचार कराल .

ट्युनिशियाच्या एका 26 वर्षीय महिलेला सलूनला भेट दिल्यानंतर किडनीमध्ये तीन ठिकाणी दुखापत झाली. या महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, संपादकाला लिहिलेल्या पत्रात फ्रेंच डॉक्टरांनी काही केस स्मूथ आणि सरळ करणाऱ्या उत्पादनांचं मूत्रपिंडाच्या दुखापतीशी कनेक्शन जोडलं आहे.
केस स्टडीमधील महिलेला यापूर्वी कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. जेव्हा ती डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा तिला उलट्या, ताप, जुलाब आणि पाठदुखीचा त्रास होत होता. लेखात म्हटलं आहे की, ‘त्याच दिवशी सलूनमध्ये केसांच्या ट्रीटमेंटनंतर तिला किडनीची गंभीर दुखापत झाली. महिलेनं सांगितलं की केसांच्या संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान तिला जळजळ होत होती, त्यानंतर तिच्या टाळूमध्ये अल्सर विकसित झाला.

तपासणी केल्यावर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आढळलं की तिच्या रक्तातील प्लाझ्मा क्रिएटिनिनची पातळी वाढली आहे. प्लाझ्मा क्रिएटिनिन हे एक वेस्ट प्रोडक्ट आहे, जे स्नायूंमधून येतं – जेव्हा ते रक्तात प्रवेश करतं तेव्हा ते मूत्रपिंडांद्वारे फिल्टर केलं जातं. जेव्हा महिला सलूनमध्ये गेली तेव्हा हेअर स्टायलिस्टने तिच्या केसांवर एक क्रीम लावली ज्यामध्ये 10% ग्लायऑक्सिलिक ऍसिड होतं. या केमिकलमुळेच किडनी खराब होत असल्याचं संशोधकांचं मत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close