खेळ व क्रीडा

मराठमोळ्या स्वप्नील ने देशाला मिळवून दिले पदक

Spread the love
पॅरिस / नवप्रहार डेस्क
           पॅरिस मध्ये सुरू असलेल्या महाकुंभात कोल्हापूरच्या मराठमोळ्या तरुणाने भारताच्या खात्यात एक पदकाची भर घातली आहे. स्वप्नील कुसाळे 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत भारतला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर स्वप्नील हा तिसरा खेळाडू आहे ज्याने देशाला पदक मिळवून दिले आहे.
1995 मध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापुर मध्ये जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला आहे. त्याने करिष्मा करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. त्याच सोबत खाशाबा जाधवांच्यानंतर स्वप्नील कुसळेने महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे.
या सामन्यात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले. त्याचवेळी युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
भारताने आतापर्यंत जिंकली 2 पदके
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दोन पदक आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. महिलांच्या या स्पर्धेत मनुने कांस्यपदक पटकावले. यानंतर मनुने सरबज्योत सिंगसोबत त्याच मिश्र स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकले.
नेमबाजीत 2004 मध्ये ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन राठोडने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने हे पदक जिंकले. यानंतर अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर निशाणा साधला. 2012 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दोन भारतीय नेमबाजांनी पदके मिळवली होती. विजय कुमारने रौप्य तर गगन नारंगने कांस्यपदक पटकावले.
यानंतर नेमबाजांना ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी 12 वर्षे वाट पाहावी लागली. ऑलिम्पिकमध्ये 3 पदके जिंकून भारतीय नेमबाजांनी गेल्या काही वर्षातील अपयशाची भरपाई केली आहे. यावेळी भारतीय नेमबाजही भारताला सुवर्ण मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close