क्राइम

त्यांचे लफडं पाहणं त्याच्या जीवावर बेतले ; गमावला जीव

Spread the love

लातूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                      महिला आणि पुरुष यांच्यातील अंतरंग संबंध पाहणाऱ्या युवकाला त्या दोघांनी  यमसदनी झाडले आहे. त्यांचे नको ते कृत्य उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या युवकाच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करून आणि गळा आवळून खून केला आहे.  गणेश गोपीनाथ वस्तुरगे (वय 32 वर्ष रा. चिद्रेवाडी, ता. चाकूर) असे मयत युवकाचे नाव असून, प्रदीप शंकर करडखेले (रा. खरबवाडी, ता. अहमदपूर) याच्यासह एक महिला आरोपी आहे.

 पोलिसांनी दिलेप्या माहिती नुसार अहमदपूर तालुक्यातील  प्रदीप शंकर करडखेले (रा. खरबवाडी, ता. अहमदपूर) याचे  उदगीर तालुक्यातील एका गावातील महिलेचे गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. सोमवारी (15 मे) रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्यात सुरु असलेले अनैतिक संबंध गणेश वस्तुरगे याने पाहिले होते. त्यामुळे गणेश आपल्या अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल अशी भीती प्रदीप करडखेले आणि संबंधित महिलेमध्ये निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांनी गणेश वस्तुरगे यांचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून त्याची हत्या केली. गणेशला संपवल्यावर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह फरफटत नेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अनैतिक संबंध सुरु असताना या युवकाने पहिल्याने आता आपली बदनामी होईल या भीतीने दोघांनी तरुणाचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारुन हत्य  केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर याप्रकरणी वाढवणा पोलिसांत दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथील प्रदीप करडखेले आणि उदगीर तालुक्यातील एका गावातील महिलेचे गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. तर सोमवारी (15 मे) रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्यात सुरु असलेले अनैतिक संबंध गणेश वस्तुरगे याने पाहिले होते. त्यामुळे गणेश आपल्या अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल अशी भीती प्रदीप करडखेले आणि संबंधित महिलेमध्ये निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांनी गणेश वस्तुरगे यांचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून त्याची हत्या केली. गणेशला संपवल्यावर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह फरफटत नेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तापसाची सूत्र फिरवली आणि प्रदीप करडखेलेसह एका महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. तर गणेशचा मोबाईल फेकून अथवा लपवून ठेवला असावा, अशा आशयाची फिर्याद गणेशच्या आई शिवगंगाबाई गोपीनाथ वस्तूरगे (रा. चिद्रेवाडी) यांनी दिली आहे. त्यानुसार वाढवणा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना गुरुवारी चाकूरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close