आध्यात्मिक

शे.घाट नगरीत श्री संत गजानन महाराज सामुहिक पारायण संपन्न

Spread the love

शेकडो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

वरूड/तूषार अकर्ते

शेंदुरजनाघाट येथे अधिकमास माह व श्रावण मासांरभा निमित्त श्री संत गजानन महाराज भक्त परिवार शे.घाट च्या वतीने शे.घाट ते तिवसाघाट रोडवरील केदारईश्वर मंदिरातील सभागृहात दि.२० जुलै रोज गुरूवार ला सकाळी ७ वाजता पासुन तर दुपारी २ वाजे पर्यंत एकदिवसीय श्री गजानन महाराज विजय ग्रंथ सामुहिक पारायण सोहळ्याचे आयोजन ह.भ.प.प्रमोद दुधे यांच्या मार्गदर्शनात पार पडले आहे.
पारायण वाचक संत गजानन भक्त अर्चना गुरव रा.अमरावती यांच्या वाणीतुन सारं वाचन पार पडले आहे.या वेळी एकुण ३३१ महिलांनी पारायणाचे वाचन केले आहे. वाचनानंतर महारांजाची महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विजय चौधरी, अमोल ढोले, निकिराज कराळे, बाबाराव पापडकर, निलेश फुटाणे, अनिल आंडे, संजय जयस्वाल, प्रकाश शिंगरवाडे, उल्लास लेकूरवाळे, नेपाल पाटिल, सुरेश भागवत, पवन मोघे, राजेंद्र वघाळे, संजय थेटे, जयकुमार आंडे, आकाश सावरकर, उमेश बाबुलकर, प्रविण अंबाडकर, प्रतिक खडसे, जगदीश अढावु, अक्षय डफरे, पंकज अकर्ते, सारंग गणोरकर, कार्तिक फुले, महेश पोटे, करूणा आंडे, पदमा माळोदे, सविता सावरकर, प्रांजली चौधरी, मोनिका भोंगाडे, माधुरी माहुरे, निलीमा कुबडे, कवीता टोंगसे, जीजा बोरकुटे, कीर्ती शिंगरवाडे आदि महाराजांच्या भक्तांचे सहकार्य लाभले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close