हिवरखेड येथे महिला शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन
रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
दि.24.07.2024 रोजी हिवरखेड ता तेल्हारा येथे तालुका कृषी अधिकारी श्री गौरव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट कॉटन प्रकल्पा अंतर्गत कापूस पीकावरील महिलांची शेतीशाळा घेण्यात आली. सदर शेतीशाळेत कापूस पिकातील तण नियंत्रण, खताचा संतुलित वापर या विषयावर कृषी सहाय्यक कु. सदार यांनी यांनी मार्गदर्शन केले. स्मार्ट कॉटन प्रकल्पात गट स्थापन करणे, गटामार्फत कापूस गाठी तयार करणे, त्यांची ऑनलाईन पद्धतीने विक्री करणे या विषयी मल्टीटास्किंग ग्रेडर व्ही एस वानखेडे यांनी मर्गदर्शन केले. शेतीशाळेला प्रामुख्याने गावातील शेतकरी महिला हजर होत्या. शेतीशाळेत ऍग्रोवनचा खरीप विशेषांका च्या प्रतीचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमात मंदा रेखाते , कौशल्या रेखाते , वंदना बनकर , मंदा शिंगणे , दिपाली शिंगणे , निर्मला राऊत, सीमा राऊत, रोहिणी ताळे, उषा ताळे, पदमा अंहेरकर आदि भरपूर संखेत महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक सदार मॅडम यांनी केले.