जागतिकविदेश

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ?  , ईरान चा जबरदस्त प्रतिहल्ला

Spread the love

 

तेहरान/कुवेत – नवप्रहार डेस्क

            इस्त्रायल, अमेरिका आणि इराण मध्ये सुरू असलेले युद्ध आता  नियंत्रणाबाहेर गेले आहे. इराणने प्रतिहल्ल्यांचा धडाका लावत कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे.

या भीषण हल्ल्यात दोन्ही देशांतील अमेरिकन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, अमेरिकेची सर्वात मोठी युद्धनौका ‘USS अब्राहम लिंकन’ वरही इराणने थेट क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

युद्धातील सर्वात मोठे धक्के
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना उध्वस्त केले आहे. येथील धावपट्ट्या, दारूगोळा कोठारे आणि रडार यंत्रणा पूर्णपणे निकामी झाल्याची माहिती आहे. हे तळ वापरण्यालायक राहिलेले नाहीत, असा दावा इराणने केला आहे. बहरीनमध्ये नौदलाचा तळ हा अमेरिकेच्या ५ व्या मोठ्या आरामाराचे केंद्र आहे. तो नष्ट झाल्याने अमेरिकेची शक्ती कमकुवत करण्यात इराणला यश आले आहे.

एअरक्राफ्ट कॅरिअर निशाण्यावर
अमेरिकेची महाकाय युद्धनौका ‘USS अब्राहम लिंकन’ सध्या अरबी समुद्रात तैनात आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांनी या नौकेवर ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून तिला युद्धाच्या मैदानातून बाहेर काढले आहे.

सूडाची कारवाई
अयातुल्ला अली खमेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने ‘ऑपरेशन शहीद खामेनेई’ सुरू केले आहे. अमेरिकन सैन्याच्या ३ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर आता ही आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यांत ५६० हून अधिक अमेरिकी सैनिक मारले गेले असल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील मार्ग बंद झाले असून जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close