गुन्हेशाखा युनिट क्र. ४, यांची कामगिरी अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक
नागपूर / अमित वानखडे
गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान, गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, सापळा रचुन दिनांक १२.०६.२०२३ चे १८.०० वा. ते १९.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, अन्नपुर्णा टि स्टॉल समोर, हसनबाग चौकी जवळ दोन संशयीत ईसमांची अंगझडती घेतली असता आरोपी १) जावेद ईसाक पठाण वय ३१ वर्ष रा. ब्राम्हणी, वनविभाग कार्यालया जवळ, कळमेश्वर २) परीस उर्फ पुष्पा राजु उईके वय २३ वर्ष रा. धरती माँ नगर, को. ऑपरेटीव्ह सोसायटी, वाठोडा यांचे ताब्यातुन एक विदेशी बनावटीचे अग्नीशस्त्र, (पिस्टल) किमती अंदाजे ५०,०००/- रू एक लोखंडी चाकु, दोन मोबाईल असा एकुण ८०,५००/- रु चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीचा साथीदार बागडे उर्फ माईकल रा. कळमेश्वर हा त्याचे मोटरसायकलने घटनास्थळा वरून पळुन गेला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द पोलीस ठाणे नंदनवन येथे कलम ३ / २५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अग्नीशस्त्रासह नंदनवन पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
वरील कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. संजय पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन ) श्री. मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गोकुल सर्यवंशी, सपोनि. अरविंद शिंदे, पोउनि, अविनाश जायभाये, पो.हवा. सुनिल ठवकर, नापोअं युवानंद कडू, चेतन पाटील, दिपक चोले, देवेंद्र नवघरे, पुरूषोत्तम काळमेघ पोअ सतेंद्र यादव यांनी केली.