गुन्हेशाखा युनिट क्र. ०३, यांची कामगिरी : – घरफोडी करणाऱ्या, हद्दपार आरोपीस अटक
प्रतिनिधी अमित वानखडे
दिनांक ०७.०७.२०२३ चे दुपारी २.०० वा. चे सुमारास गुन्हे शाखा युनिट क. ०३ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत कावरापेठ, रेल्वे लाईन जवळ, सापळा रचुन आरोपी अब्दुल रहमान उर्फ रम्मू वल्द अब्दुल रज्जाक वय ३० वर्ष रा. मुदलीयार ले आउट, शांतीनगर, नागपूर यास घातक लोखंडी चाकुसह ताब्यात घेवुन आरोपीचा अभिलेख तपासला असता आरोपी हा मा. पोलीस उप आयुक्त परि क. ३, यांचे आदेशाने सप्टेंबर २०२१ पासुन २ वर्षा करीता नागपूर शहरातुन हद्दपार असल्याचे दिसुन आले. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे शांतीनगर येथे कलम १४२, १३५, म.पो.का सहकलम ४/२५ भा. ह का अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
आरोपीची अधिक चौकशी केली असता. आरोपीने दिनांक ३०.०४.२०२३ चे रात्री ११.३० वा. ते दि. ०१.०५. २०२३ चे सकाळी ०५.०० वा. चे दरम्यान फिर्यादी अहमद रहमान पठाण वय ५९, रा. प्लॉट न. ६९, रामसुमेर बाबा नगर, नागपूर हे दाराची आतुन कडी लावुन झोपले असता त्यांचे घराचे दारा जवळील खिडकीतुन हात टाकुन कुंडी उघडुन आत प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन नमुद गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याची लगड १० ग्रॅम, किमती ६०,०००/- रू व लोखंडी चाकु किमती ५,००/- रू असा एकुण ६०,५००/- रू चा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला असुन, आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे शांतीनगर येथे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, मा. पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शना खाली वपोनि महेश सागडे, सपोनी पवन मोरे, पोउपनि मधुकर कोठाके, पोहवा दशरथ मिश्रा, श्याम अंगधुलेवार, विजय श्रीवास, मुकेश राऊत, पोअ रविन्द्र करदाते, दिपक लाखडे, दिपक दासरवार, जितेश रेड्डी, फिरोज शेख यांनी केली…