हटके

फोटोत तिला दिसलं असं काही की महिलेचे निघाले अश्रू

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क 

           अँड्रॉइड मोबाईल आले तेव्हापासून कार्यक्रमात फोटोग्राफर ची आवशकता भासत नाही. आता फोटो काढायला कुठलेच पैशे पडत नसल्याने प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमाचे फोटो काढल्या जातात. अश्याच एका कौटुंबिक कार्यक्रमात पतीने मोबाईल वर काढलेले फोटो पाहून महिलेला अश्रू अनावर झाले. चला तर पाहू या काय आहे त्या मागील कारण…

बर्थडे सेलेब्रेशनसाठी ही महिला आपला नवरा आणि मित्रासोबत एका हॉटेलमध्ये गेली. ती मित्राच्या शेजारी बसली होती आणि तिचा नवरा समोर बसला होता. महिलेचा नवरा समोर बसून तिचे फोटो काढत होता. मित्रासोबत बसून ती पोझ देत होती आणि नवरा फोटो क्लिक करत होता.

कोणीही फोटो काढला की तो कसा आला हे पाहण्याची घाई अनेकांना असते. या महिलेनेही तेच केलं. जसा नवर्‍याने फोटो काढला तसा तो कसा आला ते पाहायला गेली. नवर्‍याने फोटो दाखवताच ती शॉक झाली. तिला रडूच कोसळलं. ती ढसाढसा रडू लागली.

फोटोमध्ये काय होतं?

तुम्ही व्हिडिओ पाहाल तर ज्या हॉटेलमध्ये ही महिला बसली आहे. त्या हॉटेलच्या बाहेर बरोबर तिच्या पाठीमागे एक दुसरी महिला उभी आहे. जी महिलेचे फोटो काढताना मोबाईलच्या कॅमेर्‍यात येते. हॉटेलच्या आतील महिला जशी पोझ देत होती तशीच ही महिला पोझ देत होती. तीसुद्धा कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

फोटो पाहून का रडू लागली महिला

त्या महिलेला आपल्या फोटोमध्ये पाहून महिला रडू लागली कारण ती महिला दुसरी तिसरी कोणी नाही. तर तिची जिवलग मैत्रीण होती. जी खूप वर्षानी तिला भेटली. तिच्यासाठी हे बर्थडे सरप्राईज होतं. ते पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात.

@goodnews_movement या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. व्हिडिओवरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close