विदेश

महिलेला येत होते विचित्र आवाज तिला वाटली भुताटकी ; पण सत्य भयंकर 

Spread the love

महिलेला येत होते विचित्र आवाज तिला वाटली भुताटकी ; पण सत्य भयंकर 

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क 

                    काही वेळा घरात किंवा परिसरात विचित्र आवाज ऐकायला येतात. हा विचित्र आवाज कुठल्यातरी आत्म्याचा , किंवा भुताचा असेल असा समज होतो. घरात पुरुष मंडळी असली की महिलांना काही तरी धीर असतो. पण घरात फक्त महिलाच असल्या की मग त्यांची घाबरगुंडी उडते. या महिले सोबत ही असच घडलं. तिच्या मुलीला विचित्र आवाज ऐकू येत होते. मुलीने आईला सांगितले. आईने तपासले असता तिला देखील तसेच आवाज ऐकू आले. त्यामुळे दोघी मायलेकी खूप घाबरल्या होत्या. कारण काही दिवसांपूर्वी तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सासऱ्याचा आत्मा घरात घुमतोय असं त्यांना वाटत होतं .  पण त्या दोघींनी मिळून जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना भुताटकी पेक्षाही भयानक गोष्ट समजली.

यूकेच्या वेल्समधील ही घटना आहे. 57 वर्षीय एम्मा रीड तिच्या 12 वर्षांच्या मुलीसोबत एका घरात राहते. काही महिन्यांपूर्वी याच घरात त्यांच्यासोबत राहणाऱ्या तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळाने मुलीला घरात विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. सुरुवातीला महिलेचा यावर विश्वास बसला नाही, तिला वाटले की तिच्या मुलीला भास होत आहेत. पण जेव्हा मुलीसोबत एम्मानेही असेच आवाज ऐकले तेव्हा तिला धक्काच बसला.

कधी काहीतरी आदळण्याचे, कधी वाऱ्याचे तर कधी खडखडाटाचे आवाज. आपल्या घरात सासऱ्यांचा आत्माच आहे, असं तिला वाटलं. आवाज ऐकून ती इतकी घाबरली की तिला घरात राहायची भीती वाटू लागली. कित्येक महिन्यांपासून तिने आवाजाचा त्रास सहन केला. अखेर तिने हिंमत एकवटली आणि तळघरात ती गेली. तिथं तिला जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला. तिला येणार आवाज आत्मा किंवा भुताचा नाही पण त्यापेक्षाही धोकादायक होता. ज्यामुळे एम्मा आणि तिच्या मुलीचा जीव गेला असता.

त्यांच्या घरात बॉयलर लावलं होतं. त्या बॉयलरमधून कार्बन मोनोऑक्साइड वायू गळत होता, ज्यामुळे लोकांचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो. थंड ठिकाणी, लोक त्यांच्या घरात बॉयलर लावतात, ज्यामुळे पाणी पाईपमधून जाते आणि गरम झाल्यावर बाहेर येते. यासोबतच हा बॉयलर घर गरम करण्याचं काम करतो. एम्माने बॉयलरमधील गळती पाहताच तो दुरूस्त करून घेतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close