क्राइम

भर बाजारात पटीने कुऱ्हाडीचे घाव घालत केला पत्नीचा खून 

Spread the love

संगरूर (पंजाब ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

               महिला शशक्तिकरणाच्या वल्गना करण्यात येत असल्या तरी ‘ नारी अबला होती आणि अबलाच राहणार ‘ हे अनेक घटनेवरून सिध्द झाले आहे. नुकत्याच घडलेल्या मणिपूर च्या घटनेवरून हे समोर येते की महिला ही पुरुषांसाठी उपभोगाची वस्तू होती , आहे आणि राहणार . पंजाब च्या संगरूर मध्ये घडलेल्या या घटनेने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या थरारक घटने नंतर बाजारात काही काळासाठी खळबळ माजली होती,.

संगरुर जिल्ह्यात ही थरारक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगरूरच्या सुनम मार्केटमध्ये लोकांच्या गर्दीत या नराधमाने त्याच्या पत्नीवर वार केले. रिपोर्टनुसार, पत्तीचा खून केल्यानंतर त्या व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या करण्य्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचा खटला सुरु होता. परंतु, या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आणि सुनम मार्केटमध्ये पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. या बाजारात लोकांच्या गर्दीतच या व्यक्तीने पत्नीला संपवलं. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने विष पिऊन स्वत:चं जीवनही संपवण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

या भयानक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, पत्नीचा खून केलेला व्यक्ती हाता कुऱ्हाड घेऊन भर बाजारात उभा असल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीच्या बाजूला लोकांची गर्दी जमल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लोकांनी त्या व्यक्तीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली आणि पाण्याच्या फवाऱ्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान तो व्यक्ती लोकांनाही धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close