सावकार पुरा येथे युवा उद्योजक यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या
अंजनगाव सुर्जी / प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी शहरातील सावकारपुरा येथील युवा उद्योजक पंकज मोदी यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.
अंजनगाव सुर्जी सावकारपुरा येथील युवा उद्योजक महावीर अग्रो एजंसीचे संचालक पंकज मोदी यांची पत्नी सौ. प्रणाली पंकज मोदी वय वर्ष ३२ हिने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी फोनवरून पोलीस स्टेशन येथे रात्री बारा वाजता दिली असता ठाणेदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली व रात्रीच मृतक महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले, पोकॉ युवराज श्रीराव व एएसआय टेकाडे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून आज सकाळी ग्रामीण रुग्णालय येथे मृतक महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतक प्रणाली हिला एक 4 वर्षांचा मुलगा असून घटनेचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत