क्राइम

पत्नीने  पिला नवऱ्याच्या दारू चा कोटा ;  नवऱ्याने उगारला सोटा 

Spread the love

नवऱ्याच्या मारहाणीत बायकोचा मृत्यू

जळगाव / नवप्रहार मिडिया .

                 नवऱ्याचा दारूचा कोटा बायकोने फस्त केल्याने संतापलेल्या नवऱ्याने बायकोला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सुरवातीला अकस्मात मृत्यूची झालेली नोंद नंतर भादवी 302 मध्ये रूपांतरित करण्यात आली.

              पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  मय्यत ही जितेंद्र हेम्बरम याची पटजी असून तिचे नाव शांतीदेवी असे आहे. हे जोडपे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून कामा निमित्ताने ते धरणगाव परिसरातील हतनुर येथे वास्तव्याला होते. मोलमजुरी करून ते पोट भरत होते. कामावरून आल्यावर जितेंद्र याला दारू प्यायची सवय होती.” तर शांतीदेवी देखील दारू प्यायची.

                        जितेंद्र कामावरून आल्यावर त्याने दारू शोधली असता त्याला दारूची बॉटल खाली दिसल्याने तो संतापला आणि राग अनावर झाल्याने त्याने शांतीदेवी ला प्रथम लाथाबुक्क्यांनी नंतर पट्ट्याने मारहाण केली त्यात ती गंभीर जखमी झाली.  तिला अत्यवस्थ अवस्थेत हतनुर धरण कॅंम्प येथील रहिवासी भागवत धोंडू कोळी यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले.

 सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. अधिक तपासाअंती तिचा पती जितेंद्र हेमब्रम याने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सरकारतर्फे फिर्यादी हे.कॉ. नाविद अली सादिक अली सैय्यद यांनी फिर्याद दाखल केली. दाखल खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close