हटके

बायको दुसऱ्या वेळेस गरोदर राहिल्यावर नवऱ्याला समजले की पूर्वीची दोन मुलं त्याची नाहीत 

Spread the love

महाराजगंज  (युपी ) / नवप्रहार डेस्क

              अलीकडच्या काळात बिवाहबाह्य संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका नवऱ्याला तेव्हा भयंकर धक्का बसला जेव्हा त्याला कळले की दुसऱ्यांदा गरोदर असलेली पत्नी त्याच्यामुळे गरोदर राहिली  नाही. तसेच पूर्वीची दोन अपत्ये देखील त्याची नाही. यामुळे तो पुरता कोलमडला आणि त्याने तो निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महाराजगंज जिल्ह्यातील पणियारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. संबंधित व्यक्ती त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आनंदाने राहत होते. मात्र, त्याची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर त्याला संशय आला. त्याने पत्नीची चौकशी केली असता तिचे त्याच गावातील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. एवढेच नाहीतर दोन्ही मुले त्याची नसून प्रियकराची असल्याचे तिने सांगितले.

पत्नीने पुढे सांगितले की, तिचे गावातील एका तरुणासोबत गेल्या ४-५ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. हे दोघेही लपून-छपून एकमेकांना भेटायचे. याची कोणालाच माहिती नव्हती. मात्र, अशा भेटीतून तिने प्रियकराच्या दोन मुलांना जन्म दिला, ज्यांना तिच्या पतीने आपले समजले होते.

पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने पतीला संशय आला. पतीने चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. पत्नीबाबतचे कटू सत्य समोर आल्यानंतर पतीला धक्काच बसला. पत्नीने तिच्या प्रियकराशी लग्न केल्याचे समजताच त्याला आणखी धक्का बसला. यानंतर पतीने त्याच्या पत्नीला घराबाहेर काढले. यानंतर ती प्रियकराच्या घरी पोहोचली. पण प्रियकरानेही तिला घरात ठेवण्यास नकार दिला. मात्र, गावकऱ्यांनी दबाव आणल्याने प्रियकराला नमते घ्यावे लागले.

 

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close