क्राइम

सोनसाखळी चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद

Spread the love

पोलिसांनी अवघ्या दोन तासांत लावला घटनेचा छडा
भंडारा/जि.प्र.

भर रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत दोन चोरट्यांचा अवघ्या दोन तासांत छडा लावला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्रीच्या सुमारास गणेशपूर येथे करण्यात आली असुन, अतुल राजू भांबोळे (३०, रा. लाला दरवाजा, पाचपावली, नागपूर) व पप्पू शामलाल बुराडे (२३, रा. कळमना, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोन सराईत चोरट्यांची नावे आहेत.उल्लेखनीय म्हणजे या चोरट्यांवर विविध पोलिस ठाण्यात १५ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.
गणेशपूर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन इसमांनी लांबवली. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व भंडारा पोलिस ठाण्यात देण्यात आली. सदर तक्रारीची दखत घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक प्रीती कुळमेथे, कॉन्स्टेबल सतीश देशमुख, साजन वाघमारे,पोलिस नायक शैलेश बेदुरकर, श्रीकांत मस्के, ईश्वरदत्ता मडावी, अंकोश पुराम, सुनील राठोड, योगेश पेठे, सुनील ठवकर, कौशिक गजभिये, हिरा लांडगे आदीनी शोध घेतला असता दरम्यान,आरोपी गणेशपूर उपसा सिंचन प्रकल्पाच्या दिशेने पळाल्याचा सुगावा लागताच,चोरटे उपसा सिंचन प्रकल्पा जवळ लपण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना पकडण्यात आले. दरम्यान त्यांच्या ताब्यातून दुचाकी, सोन्याची मणी असा एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close